तू

तू फुलाचा गोडवा
तू प्रभातचा पारवा
रात्रीच्या गारव्यातही
तू चमकणारा काजवा.

तू रंगीन स्वप्न
तू लुकलुकत चांदण
तू रानातील एकट माळ
तू मोकळ आभाळ.

तू चंद्राची कोर
संगे चांदण्याची नाव
तुझे नी:श्बद डोळे
दिसे प्रेमाचे भाव

तू मनाची असूया
यु स्वप्नाचे गाव
प्रेमाने भारावलेल्या मनात
फक्त तुझे आणि तुझेच नाव...........

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा