ती मला सोडून गेली...

कोणतेही करण न देता
ती मला सोडून गेली...
ह्या हसनार्या डोळ्याना
अश्रुंची भेट देऊन गेली...

जाता जाता बघा ना
काय करून गेली...
ह्या दगडाला
प्रेम शिकवून गेली...

दोन दिवसात तिच्या
हाताला मेहंदी लागली..
माझी माझी म्हणताना
ती मलाच परकी होउन गेली..

गेली सोडून पण..
मला तिचे वेड लावून गेली..
मला पण तिच्या आठवाणित जगायची
सवय होउन गेली..

काल ती मला
त्याच्या सोबत दिसली..
मला पाहताच नेहमीप्रमाणे
गोड हसली...

माझी नजर थबकली
ती माझ्याकडेच
एक टक बघत होती...


तिच्या जवळ गेलो..
आणि म्हणालो...
जोड़ी छान दिसते..
आणि मनातल्या मनात हसलो..

ती म्हणाली अरे
मम्मी तुला विचारत होती..
तुझा मित्र लग्नाला आला नाही..
म्हणुन खुप रागावली होती..

मी म्हणालो..
माझ्या पाठीत कोणीतरी
सुरा खुपसला होता...
जखम खुप खोल झाली होती...

वार पाठीवर पण..
जखम मनावर झाली होती..
जखम पण
जवळच्या व्यक्तीने केलि होती

तिची ताठ मान शरमेने झुकली..
ती फिरली आणि चालू लागली..
तिची पाठमोरी आकृती..
माझा ओल्या डोळ्याना अस्पष्ट दिसू लागलेली...

कवि: मोहित ... 

3 comments