कसे समजावू या मिरेला,
कान्हा नाही भेटला या राधेला,
मैय्यालाही नाही माहित,
चित्तचोर कुठे गायब झाला !!
गवळणी सगळ्या म्हणती,
चित्तचोर त्यांचाच सांगाती,
कसे समजावू तुम्हाला,
कान्हाची तर या राधेवरच प्रीती !!
मिरे बघ जरा निरखून,
झुला नाही तो रिकामा,
राधेसवे तो कान्हा,
वाजवी तिथे पावा !!
गवळणी वेडया, मिराही वेडी,
त्यांना मुळी कळतच नाही,
राधेचा कान्हा अन कान्हाची राधा,
जन्मोजन्मीची वेडी !!
मुख्यपान कान्हाची राधा वेडी.......!!
कान्हाची राधा वेडी.......!!
by Vinayak
|
posted: २/१९/२००९
|
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा