पुन्हा नवे स्वप्न

पुन्हा नवे स्वप्न
ह्रुदयात माझ्या रुजवताना
रात्रीच्या त्या थंडित
पाहिले तुला जाताना

रात्र ही सारी
स्वप्नात तुझ्या रंगली
साथ द्यायला मात्र
गर्दी चाद्न्याची जमली

तुला बघन्यसाठी
चंद्र वाट बघतो
उघडून दार स्व्प्नाचे
तिष्ट्त मला ठेवतो

स्वप्नाच्या त्या राशी
तो मला दाखवितो
घेउनी एखादे स्वप्न
रंगून त्यात जातो

पुन्हा तीच स्वप्नपरी
स्वप्नात माझ्या येते
अर्धावरला डाव तो
पुन्हा नव्याने खेळते


सुंदर अशा जखमा
पुन्हा ओल्या करते
डोळ्यातले अश्रु
पुन्हा ओजळीत घेते ळी

समोर करुनी ओजळ
आठवणी पिउन घेतो
भिनुदे रकता रक्तात
जिव कासाविस होतो

सवय ही लाउन
अदुश तू झाली
तुला शोधण्या साठी
दचकून जाग आली

पुन्हा नवे स्वप्न
मला देऊन गेली
अनंत अशी निशा
भेट देऊन गेली

पुन्हा नवे स्वप्न ..

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा