भेट तुझी माझी स्मरते

स्मरते मला ती सांज तो धुंद झोम्बनारा वारा
प्रेमवर्शाव करीत होता जणू आसमंत सारा

भेट पक्की झाली होती सर्वांच्या समतिने
तरी बावरे मन माझे कापत होते भीतीने

रुबाबदार रूप मिरवित आला ऐटीत एकटाच
लाजले " चल जाऊ बाहेर" हे बोल त्याचे ऐकताच

होती शेकडो माणसे जरी आमच्या सभोवति
नजर मात्र आमची खिलली होती फ़क्त एकमेकांवरती

ऐकल होत प्रेमात पडताना बधिर होतात विचार
त्याला बघितल्यावर कितीदा वाजली ह्रुदयात गिटार

एकमेकांच्या नकळत मन वेगळ्याच विश्वात रमल
समोरच cold-drink सुद्धा तेंव्हा शैम्पेन सारख वाटल

हाती हात माझा धरताच मज अस्मान झाले ठेंगाने
वाटले जीवनात आता काही राहिले नाही उणे

त्याच्या त्या स्पर्शाने उठले हजारो रोमांच कांती
न जाणे कितीदा थरथरली माझ्या डोल्यांवरली पाती


हलुवार हसत मला म्हणाला " तुझे रूप भरावे लोचनी
असाच हात धरुनी तुझा चालत रहावे जीवनी"

" चल जाऊ आत्ता घरी घेऊ थोरांचे आशीर्वाद
वचन देतो तुला संसारी कधी होणार नाहीत विवाद "

ऐकताच त्याची ती मधुर वाणी मी क्षणांत दिला होकार
मी पाहिलेले रम्य स्वप्न तेंव्हा झाले होते साकार

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा