मला खुप यातना झाल्या, जेव्हा ती म्हणाली,
" मी प्रेमात पडलेय रे त्याच्या......."
पण तिच्या अपेक्षेप्रमानेच मी तेव्हा तिची थट्टा केली.
अन तिची कळी लगेचच खुलावली,
तिला काय सांगू काय नको झालेलं,
असं तिला मी कितेंदा तरी पहिलेल.
मी म्हणालो, "मज्जा आहे बुवा एका मुलीची!"
ती म्हणाली, " तुला पण मिळेल रे साथ कुना सुंदरीची!"
मन रडत असतानाही हसत होतो,
तिला समजू न देण्याची सगळी काळजी मी घेत होतो.
तिला पण काहीच कळलं नाही,
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसल नाही.
मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची,
कारण ती मला आपला "मित्र" मनायाची.
wastav ...kavita mazya babtit ghadleli....
उत्तर द्याहटवा