आरसा मनाचा....
by Vinayak
|
posted: ७/३१/२०१०
|
2
comments
माझं मन , मनाचा आरसा
आरश्यात प्रतिबिंब, माझंच का?
चंचल मन . बदलणार मन
असाच बदलणारा आरसा मन
बदलत्या आरश्यात बदलतं रूप
माझचं मला भासे अनोळखी रूप
काळोख्या काजळरातिचं अन कधी
लक्ख सूर्य प्रकाशातलं तर कधी
संध्याछायेतलं, सतत बदलतं ...
माझचं का हे रूप? माझचं हें रूप ....
आता आरशालाही झाली आहे सवय
बदलत्या रुपांना न्याहळायाची ,
साठवून ठेवून मग............
नको तेव्हा नको ते दाखवायची ....
वेडं मन
by Vinayak
|
posted: ६/१२/२०१०
|
0
comments
जाता जाता आठवण म्हणून
डोळ्यांत अश्रू तू देऊन गेलास
माझ्या मनाला माझ्यापासूनच
परकं करून गेलास
रुसले हे मन माझे
माझाशी आज बोलत नाही
तू न माझा राहिलास
हे त्या वेड्याला पटत नाही
कितीही समजावले तरी
माझे तो मानतच नाही
तुझ्याच विचारात राहतो
माझे दु:ख त्याला कळतच नाही
वेडं हे मन माझे
तुझी वाट पाहणं सोडत नाही
तू परत कधीच येणार नाही
कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही
फक्त माझ्यासाठी
by Vinayak
|
posted: १/२९/२०१०
|
0
comments
आज एकटेपणा खायला
उभा राहीलाय पुन्हा
आठवणीचा पसारा पसरून
राक्षशी जबडा पसरून
हतबल मी लाचार मी
असं वाटतं काय तूला
झोकून पण नाही देणार मी
तुझ्यात ...........
विसरेल तूला,
समोर सुंदर वर्तमान असतांना
का बघू मी मागे
असतील ना तूझ्या आठवणी
काय कामाच्या त्या
फक्त डोळ्यात आणतात पाणि
नकोय मला ते
ह्रुदयाच्या चिंध्या करायला
जखमा शिवून घेतल्याय मी
ओठावर हास्य
आता आता ..
तर फुलायला लागलय
बगिच्यातली फुलं मोहक दिसू लागली
आता आता..
मन
by Vinayak
|
posted: १/२९/२०१०
|
0
comments
मन गुंतले निसर्गी या ...
मन गुंतले निसर्गी या ...
हळूच बोलले मी मलाच ..
कोण ग या साम्राज्याचा धनि ,
ध्वनि उमटला नाद ब्रम्ही
घंटा वाजली दूर वारुळी...
पक्षी मग्न गीत गुन्जनी ....
हिरवागार निसर्ग बोले ...
पानाफुलात हवा दाटली...
बासुरिचे सुर् मनी विसावले ...
ओमकार मग कानी घुमला ...
मेघाला पण जाग आली..
बिजलिसम ती राधा नाचे ....
खेळ रंगला, नदितिरी विश्वेश्वराचा ...
क्रिश्नवर्नी मेघ गरजला ..
ओलिचिम्ब धरा झाली ...
पानोंपानी कृष्ण पाहिला ...
राधेचा हां श्याम बावरा
श्रीहरी माझा आज पाहिला
साम्राज्याचा शोध लागला...
वेडं मन
by Vinayak
|
posted: ११/०३/२००९
|
0
comments
वाहत्या या वाऱ्याला,,,,
कधीच थांबवायचं नसतं....
मनातील दुखांना मात्र,,,
नेहमीच आवरायचं असतं....
समुद्राच्या लाटांना,,,,
कधीच अडवायचं नसतं....
नयनांच्या आसवांना मात्र,,,
पापण्यातच थांबवायचं असतं.....
फुलाच्या गंधाला कधीच,,,
दरवळल्यावाचून ठेवायचं नसतं.....
तुझ्या आठवणींच्या गंधाला मात्र,,,
मनातच जखडायच असतं......
इंद्र-धनुच्या रंगांना,,,,
इकडे-तिकडे पसरवायच नसतं....
आयुष्यातील प्रत्येक रंग,,,,
जरी बिखरलेलं असतं..........
पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांना,,,
गप्प करायचं नसतं.....
मनातील इच्छांना मात्र,,,
ऐकून सोडायचं असतं.....
कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
by Vinayak
|
posted: ८/११/२००९
|
3
comments
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
नजरेला आस तुझी
ओढ हृदयास तुझी
आतुर हे नयन माझे
झलक पाहण्यास तुझी
पाहण्याचा तुला रोज शोधतो मी पर्याय
कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
दिन रात भास तुझा
मनाला या ध्यास तुझा
हवाहवासा ग वाटे
मला सहवास तुझा
तुझी साथ जीवनात हवी आता ग जगाय
कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
मन...
by Vinayak
|
posted: ३/०९/२००९
|
1 comments
वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्यात रुसुन बसतं….
कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…
कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…
कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…
कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….
कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट
कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा
एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं
खरच मन किती वेड असत...
by Vinayak
|
posted: २/०९/२००९
|
0
comments
खरच मन किती वेड असत...
खरच मन किती वेड असत,
कधी हसत कधी रुसत.
कधी कधी ते,
आपल्याकडेही नसत.
फिरत असत इकडे - तिकडे ...
हव ते मिळ्वन्यासाठी,
खरच मन वेड असत ...
पण का???
का??
जे हव असत
ते कधीच मिळ्त नसत????
पण,
जे मिळत नसत तेच का हव असत???
खरचं का मन् वेड् असत्????
खरच मन किती वेड असत,
कधी हसत कधी रुसत.
कधी कधी ते,
आपल्याकडेही नसत.
फिरत असत इकडे - तिकडे ...
हव ते मिळ्वन्यासाठी,
खरच मन वेड असत ...
पण का???
का??
जे हव असत
ते कधीच मिळ्त नसत????
पण,
जे मिळत नसत तेच का हव असत???
खरचं का मन् वेड् असत्????
खरेच तुझ्या मनात काय आहे !!!!!!!!!!
by Vinayak
|
posted: १/१२/२००९
|
0
comments
रात्रीत दडलेली पहाट आहे की
मुठीत दडविलेली इवलिशी अत्तराची कुपी आहे
सांग ना रे मनात काय आहे............
मी म्हणाले हो तर तू नाही म्हणतोस
मी नाही म्हंटले की तू हो म्हणतोस
आपले एकाच गोष्टीवर एकमत केव्हा होणार आहे
सांग ना रे मनात तुझ्या काय आहे............
एकदा म्हणतोस तू माझी सर्वात चांगली
मैत्रिण आहेस
एकदा असे म्हणतोस की माला अशी हवी जिच्याशी
साता जन्माच्या गाठी बांधेन
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे.............
कधी माझ्याकडे पाहून गोड हसतोस
तर कधी लटक्या रागाने पहातोस
सांग ना रे आशा वेळी तुझ्या मनात काय नक्की काय असतं.....
राग तर तुझ्या कायम नाकावर असतो
अणि गंमत म्हणजे हसुही कायम ओठावर असतं
पटकन चिडून रागवल्यावर sorry पण लगेच म्हणायचे असतं
सांग ना रे आशा वेळी तुला नक्की काय म्हणायचे असते.......
सांग ना रे तुझ्या मनात आशा वेळी काय असतं.....
हळवं मन.........
by Vinayak
|
posted: १०/०९/२००८
|
0
comments
बाबा, आठवतं का तुम्हाला....?
लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी
तुम्ही अन् आई आला होतात ....
मी रडत होते शाळेत न जाण्यासाठी
आईचाही जीव कळवळला होता
मला असं एकटं सोडायला .....
अशी एकमेकांपासून दूर जायची
ती पहिलीच वेळ -- तुमचीही अन् माझीही.....
पण तुम्ही निश्चल होतात...
राकट सह्यांद्रीसारखे...
आईला समजावत होते तुम्ही
"गाड़ी रुळावर आणायची आहे ना ?
धीर ठेव..अगं आपलीच कळी ती
फुलायची आहे अजून....."
आईही मग गप्प बसली
काहीतरी समजल्यासारखी.....
अन् मग घरी येऊन गप्प बसलात..
काहीतरी विचार करत...माझी बाहुली गोंजारत ...
तुम्ही शांत होतात अगदी शीतल चांदण्यासारखे
पण...आसवांचा पूर आला होता बेफाम नदीप्रमाणे
तुमचंही मन झालं होतं......हळवं,निरागस .....
अगदी...... अगदी माझ्यासारखं......
लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी
तुम्ही अन् आई आला होतात ....
मी रडत होते शाळेत न जाण्यासाठी
आईचाही जीव कळवळला होता
मला असं एकटं सोडायला .....
अशी एकमेकांपासून दूर जायची
ती पहिलीच वेळ -- तुमचीही अन् माझीही.....
पण तुम्ही निश्चल होतात...
राकट सह्यांद्रीसारखे...
आईला समजावत होते तुम्ही
"गाड़ी रुळावर आणायची आहे ना ?
धीर ठेव..अगं आपलीच कळी ती
फुलायची आहे अजून....."
आईही मग गप्प बसली
काहीतरी समजल्यासारखी.....
अन् मग घरी येऊन गप्प बसलात..
काहीतरी विचार करत...माझी बाहुली गोंजारत ...
तुम्ही शांत होतात अगदी शीतल चांदण्यासारखे
पण...आसवांचा पूर आला होता बेफाम नदीप्रमाणे
तुमचंही मन झालं होतं......हळवं,निरागस .....
अगदी...... अगदी माझ्यासारखं......
नवीन अभिप्राय