सरीता पवित्र,
उगमापासुन सागरापर्यंत,
निर्लज्ज मानव,
तृष्णेपासुन थुंकण्यापर्यंत...
गंधित धरणी,
मृगापासुन बहरण्यापर्यंत,
उन्मत्त वराह,
मजेपासुन लोळण्यापर्यंत,
निवास भुषण,
थकव्यापासुन विसाव्यापर्यंत,
वर्तन लांछीत,
मिरवण्यापासुन झिंगण्यापर्यंत,
प्रेरीत ममता,
मायेपासुन ताकदीपर्यंत,
मतलबी लबाडी,
हारण्यापासुन मरण्यापर्यंत,
निर्लोभी भावना,
भक्तिपासुन यशापर्यंत,
चिंतन साधना,
जगण्यापासुन मोक्षापर्यंत.....
मुख्यपान "आपण" असे की असे
"आपण" असे की असे
by Vinayak
|
posted: १/३१/२००९
|
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा