समई आणि .. मी



जळणारी वात अशीच रात्रभर जळत राहिली ..
तेल संपणार नव्हतचं ..
अगदी काठोकाठ भरलेल्या मोठ्या समईतुन ..
हेलकावणारी आकृती ..
समोर ठेवलेल्या फोटोवर ..
एक मंद काजळी पसरवत ..
आणि प्रत्येक हेलकाव्यातुन ..
ओकल्याप्रमाणे बाहेर सुसाट निघणारी ..
पुन्हा एक काजळाची धार टाकत ..
ति अशीच जळत राहिली ..

समईला तिच स्वतःच अस्तित्व नसतचं ..
फक्त ठेऊ तिथे तेवत रहायच ..
कधी कोठ्यावर, कधी देव्हाऱ्यात ..
तर कधी असचं कुठेतरी ..
आठवणींची काजळी ओकत ..
कुठल्याश्या फोटोपुढे कुणाच्या तरी आठवणींना उजाळा देत ..
पूर्ण वाचा ...

"थेंब- थेंबसा उरतो मी".....

ओठांवरती गाने यावे
असेच तुजला स्मरताना
तशीच अलगद सांज ढलावी
तुझ्याचसाठी झुरताना

पक्ष्यांची ही कुजबुज रानी
तुझ्याचसाठी आज असे
तुला न बघता मधुर चांदने
शांत शांतसे आज दिसे

हुरहुरनाऱ्या कातरवेळी
तव गंधाचा येई वारा
रिमझिम रिमझिम बरसत राही
आठवनिंच्या श्रावणधारा

भास तुझा आभास तुझा मग
कलेल मजला ध्यास तुझा
बघता बघता कनान्मागे
छ्लेल मजला श्वास तुझा

तव श्वासाच्या भेटीसाठी
नकळत वेडा ठरतो मी
मंद मंद या श्वासान्मधुनी
थेंब थेंबसा उरतो मी..........
पूर्ण वाचा ...

मी अशी .......... तुला हवी तशी !

मी अशी .......... तुला हवी तशी !
मी अशी, मी तशी,
मी तुला हवी तशी,
मी चंचला, मी अबोली,
तुज पाहता, चढ़े गालावर लाली !
मी उड़ते, मी झूलते,
फुलपाखरापरी बागड़ते,
तुझ्या येण्याने मी बावरते !
मी गाते, मी फेर धरते,
हळूच येउन,
तुला छेडूनी जाते !
मी हसरी, मी लाजरी,
मी हळवी, जराशी बावरी,
दुराव्याने तुझ्या मुसमुसते !
मी फूलते,
मी बहरते,
तू स्पर्शिता,
मी लाज लाजुनी,
मिटून जाते !
पूर्ण वाचा ...

तरीही मी उभाच आहे

तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे
पूर्ण वाचा ...

मी जेव्हा नापास झालो...

मी जेव्हा नापास झालो. ...
वाटल जगण्याला मी नालायक ठरलो.
तोन्ड खुपसुन उशीत ढसा ढसा रडलो,
पराभवाच्या ओझ्याने पार खचलो.

असे का झाले म्हणुन
स्वतःवरच चीडलो,
कुवतच नाही मझी समजुन,
नैराश्याच्या भोवर्यात पडलो.

आठ-दहा दिवसानी
डोळ्यातल पाणीही सुकल,
आणी वेड मन माज
आत्महत्येच्या विचारपर्यन्त पोहोचल.

ओळखीचा एक चेहरा
त्यावेळी आला सावराया,
म्हणाला निर्णय घेताना
आई-वडिलान्चा विचार नको का कराया?

म्हणाला चढ-उतार तर
आयुष्यात येतच राहतील,
प्रत्येकवेळी काय मी
अशच हरुन जाशील?
पूर्ण वाचा ...