आई म्हणजे .........

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी


आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........




अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

59 comments

  1. Khup khup chan kavita ahe.... Jagatli saglyat mahatwachi vaykti... AAI

    उत्तर द्याहटवा
  2. Its True, I Like So Much B'coz I Love so Much My Mom In The World.

    उत्तर द्याहटवा
  3. आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
    तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
    सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
    तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

    he kadave farach sundar

    उत्तर द्याहटवा
  4. आई म्हणजे आई....that's no world to explain what is आई........
    in fact in my view my आई means my God..my inspiration.....

    from kishor desai

    उत्तर द्याहटवा
  5. I LIKE IT VERY MUCH & EVERY WORD OF THIS POEM MADE GREAT IMPACT ON ME..................THANK YOU

    उत्तर द्याहटवा
  6. as it is in the poem my mother is not like that actually i dont have a mother if some one can answer my question what is a mother indeed please email me at more.bebo@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  7. Gheto aapan itake ki
    Dyayachehi rahun jate,
    Aaichya kartrutvaavar
    Lihayachehi rahun jate!
    -- Rajendra Gaikwad

    उत्तर द्याहटवा
  8. आपल्या बलाचे आश्रू पुसयला
    ती सतत तयार असते....
    आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे.......
    म्हणुन ती सतत तलमलत असते...
    आई म्हणजे आई असते
    जगा वेगळी बाई असते...

    उत्तर द्याहटवा
  9. i am kisan sopan tavhare. what is ai.ai means who has given you most valuable life.so take care your mother and father.my mob no. is 9730358603(india)

    उत्तर द्याहटवा
  10. aai ya shabdat jag samawte aaiwar kai bolnar sagale shabda apure ahet aai ani aai

    उत्तर द्याहटवा
  11. khupach sundar kavita aahe.aaichi mahati hi jagahun thor aahe.aai shivay jagat kuthalihi gosht shakya nahi.

    उत्तर द्याहटवा
  12. Hi Kavita Khupch Sunder aahe.
    hi kavita vachatana Dolyat Mayeche Ashru
    tayar Hotat. Mala Maji AAi Khup Avadate

    उत्तर द्याहटवा
  13. va aai ya shabdapudecha sarva kahi phike ahe..........

    उत्तर द्याहटवा
  14. Life me 3gifts kabi miss na krna

    1-LoVeR (GOD ka dia gift)

    2-PaReNtS (Gift me aaye GOD)

    3-FrIeNd (GOD ko b ni milne vala gift)

    उत्तर द्याहटवा
  15. आई साठी काय लिहू
    आई साठी कसे लिहू
    आई साठी पुरतील एवढे
    शब्द नाहीत कोठे
    आई वरती लिहीण्याइतपत
    नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

    जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
    जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
    जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
    जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

    आई तू उन्हामधली सावली
    आई तू पावसातली छत्री
    आई तू थंडीतली शाल
    आता यावीत दु:खे खुशाल

    आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
    आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
    आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
    आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

    आई म्हणजे आरतीत वाजवावी
    अशी लयबध्द टाळी
    आई म्हणजे वेदनेनंतरची
    सर्वात पहिली आरोळी........




    अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
    संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
    हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

    आई, तुझ्या रागवण्यातही
    अनूभवलाय वेगळाच गोडवा
    तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
    फिका पडतो दसरा नि पाडवा

    आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
    तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
    सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
    तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

    एकदा जरासं कुठे खरचटलो
    आई, किती तू कळवळली होतीस
    एक धपाटा घालून पाठीत
    जख्मेवर फुंकर घातली होतीस

    जख्मं ती पुर्ण बुजली आता
    हरवून गेली त्यावरची खपली
    तो धपाटा, ती फुंकर, ती माया
    ती हरेक आठवण मनात जपली

    आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
    हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
    कितींदा नव्या हृदयाचा संदेश
    देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

    आई, हजार जन्म घेतले तरी
    एका जन्माचे ऋण फीटणार नाही
    आई, लाख चुका होतील मज कडून
    तुझं समजावनं मिटणार नाही

    आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
    तरी तू मला शोधून काढशील
    आई, तुला एकदाच हाक दिली
    तरी अब्जांनी धावून येशील

    उत्तर द्याहटवा
  16. aaj kharch aathvan yatey khanakhanala pn aie tu naste ashru pusayla.

    उत्तर द्याहटवा
  17. देवाला सर्वाँकडे लक्ष देणं शक्य नाही म्हणुन त्याने आई निर्मान केली

    उत्तर द्याहटवा
  18. आठवे ते बालपण ...
    आयुष्याच्या याही उंबरठयावर.....


    राजा-राणीची गाथा ऐकवी आगळी वेगळी
    आजोबांची बोली ह्रदयाला भेदी
    त्या वृक्ष कडूनिंबाची छाया आठवी
    घराच्या मागच्या उंबरठयावर
    तासन् तास बसूनि मैत्रीसंगी
    थट्टा मस्तीचे ते बोलं,
    तो गारव्याचा स्पर्श हळूवार स्मरती जीवाला
    मिठूराज कमाल दाखवी
    मिठू-मिठू बोल बोलून
    मधुरस ओथंबत, माझ्याशी संवाद घालीत
    जीवाशिवाची जडली मैत्री
    जणु नात्यांनी बाधंली गाठ
    मला मानवे ते बालपण
    का हिरावले आज
    मोठेपणाचा हा दृष्टपणा
    न मानवे आज
    मिळेल का पून्हा ते क्षण
    मागते मन माझे , वारंवार .....

    ---- ज्योती नागपूरकर .



    उत्तर द्याहटवा
  19. आई, हजार जन्म घेतले तरी
    एका जन्माचे ऋण फीटणार नाही
    आई, लाख चुका होतील मज कडून
    तुझं समजावनं मिटणार नाही

    manala sparshnaare.....

    उत्तर द्याहटवा
  20. वरुणाची कृपा


    झुंजला हा पाऊस
    घेरली ही धरणी मायी
    सळसळणारया ह्या सरी,
    एकमेकांशी वाद घालतं
    तेजपूंज प्रकाश फेकत,
    कडाडी विजताई
    धरणी मायी हि थरथरली,
    हा उग्र रूप बघून
    क्रूर इशाराची ध्वनी ऐकून,
    झाडे-वेली घर-दारे
    कोलमडली
    पक्षी जनावरे हि चक्रावले,
    वरुणाचे हे रूप बघून
    जीव म्हणतो कधी
    पाणी-पाणी
    दिला हा इशारा,
    आता;
    पाणीच पाणी चोहीकडे .. !

    ….. ज्योती नागपूरकर .

    उत्तर द्याहटवा
  21. भावसरी

    या क्षणातून मी आनंदले
    काय वाटले, मला न कळले
    अरे ! जाणावे न असे
    या माझ्या आगोश्यात
    काही तरी नवीनच घडले
    शहारलेल्या अंगावर जणू
    दवबिंदू पडले,
    बघुनी हे माझ्या डोळ्यानी
    ओजंळीत मी धरले
    भरभरूनि साडांवे असे
    मला न कळले
    बघता-बघता मी चिंब झाले
    पावस सरीने मला घेरले
    या स्पर्शाचा, या धूदींत
    जाणले, सावळ्या ढगांचा
    पाशात मी अडकले
    मला न कळले
    जाग येताच ताडकन्
    उठले, स्वप्नातल्या
    या भावसरीत जणु
    मी; न्हावूनच आले ....

    ...... ज्योती

    उत्तर द्याहटवा
  22. संवाद माझा निसर्गाशी

    लाजरी मुजरी जणु वृक्ष वेली तुरी
    जसे शंखाच्या, शिल्पाच्या गर्भात
    लपलेले मोती जणु
    हळूच पानांच्या अंगावर पडलेले
    दवबिंदू सारखे
    हाताच्या ओंजळीत पकडलेले
    कोंबडीचे पिलू जणु
    लाजलेल्या नजरेच्या, मनाच्या कोवरयात
    लपलेल्या स्पदंनाच्या, अंगावर शहारलेल्या
    ओलाव्याचा, उबदार वाटणारया स्पर्शाचा,
    न्याहळीत, गोंजरीत,
    स्वताला सावरीत शंकेच्या नजरेने जणु,
    निसर्गाशी संवाद साधीत,
    असेच का हे जीवन
    हेच का हे जीवन .... ? …..???..

    …. ज्योती

    उत्तर द्याहटवा
  23. Apali Aai jar geli na Tar Kiti shoda Purnna jagat kadhich sapadnar nahi Aaila Tras Mulich deu naka

    उत्तर द्याहटवा
  24. नमस्कार मी रोहन घाडगे मी कविता केली आहे तिची लिंक पुढे आहे कविता आवडली तर नक्की share कराwww.rohanghadage.blogspot.com open करा माझी पहिली कविता " सर्वाना बहिण मात्र असावी"
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा